Add Your Heading Text Here

तुमच्या स्वप्नांना सत्यात कसे आणायचे?

स्वप्न कोणाला नाहीत, बारक्या बाळापासून ते म्हाताऱ्या आजोबांपर्यंत प्रत्येकाची वेगवेगळी स्वप्ने आहेत. कोणाचं मोटारसायकलच तर कोणाचं करोडो रुपयाचं सामराज्य बनवण्याचं.

पण प्रश्न हा आहे कि हि स्वप्ने पूर्ण करायची म्हणजे सत्यात उतरवायची कशी???
( हा तुमचं स्वप्न जर ऐश्वर्या राय सोबत लग्न करायचं असेल तर ते नाही पूर्ण होऊ शकत😉)
आपल्या मूळ मुद्याकडे येउयात….
तर स्वप्न पूर्ण करायची म्हणजे काय?
तर जी स्वप्ने आपण पाहतो, त्यासाठी काम करायचं आणि ती सत्यात उतरवायची, यालाच आपण स्वप्न सत्यात उतरवणे असे म्हणतो.

आता स्वप्न सत्यात उतरवता येतात का?
हो, आपण नवीन असे काही करत नाही. कारण आपल्या आधी असे अनेक लोक आहेत ज्यांनी आपली स्वप्न पूर्ण केली आहेत. त्यामुळे अशक्य असं काही नाही फक्त ते पूर्ण करण्याची इच्छा आपल्याकडे असली पाहिजे.

स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी काय करायचे?

पहिली पायरी : स्वप्न बघा.
आता तुम्ही म्हणाल कि स्वप्न बघणं कस बर तर जर तुम्ही तुम्हाला काय पाहिजे याच स्वप्नच बघितलं नाही तर ते पूर्ण कस होणार, त्यामुळे स्वप्न बघा….

दुसरी पायरी : तुमच्या स्वप्नांना ध्येय बनवा..
स्वप्न बघून पूर्ण होत नाहीत तर त्यासाठी काम करावे लागते. जी स्वप्ने तुम्ही पाहत आहात ते आधी लिहून काढा. लिहून काढल्यामुळे तुम्हाला ते स्वप्न सारखं आठवत राहील आणि तुम्ही त्यासाठी काम कराल.

तिसरी पायरी :- तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करा.
आता तुम्ही स्वप्न पाहिलं ते पूर्ण करण्यासाठी ते लिहून काढलं… या नंतरची पायरी म्हणजे त्या लिहून काढलेल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे याचे नियोजन करणे. कोणत्या गोष्टी केल्याने तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहचताल हे तुम्ही ठरवा आणि ते पूर्ण करण्यासाठी कोणते आणि कशाचे नियोजन करायला पाहिजे हे देखील तपासा.

शेवटची पायरी :- केलेल्या नियोजनाची अंमलबजावणी करा.
तुम्हाला भूक लागलेली आहे, घरात स्वयंपाक पण केलेला आहे तुम्हाला जेवायला वाढलं देखील आहे पण जर तुम्ही ते खाल्लंच नाही तर तुमचं पोट भरणार आहे का???? तसेच तुम्ही स्वप्न बघितलं, त्याच ध्येय बनवलं ते पूर्ण करण्यासाठी नियोजन केला किंवा योजना बनवली आणि जर तुम्ही त्यावर कृतीच केली नाही तर ते पूर्ण होणार नाही. त्यामुळे केलेल्या नियोजनाची अंमलबजावणी करणे हे खूप महत्वाचे आहे.

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवू शकता. अडचणी येतील पण हार मानू नका . काहीही अडचण आली कि आपले स्वप्न आठवा आणि कामाला लागा…. तुमचं स्वप्न नक्की सत्यात होणार..
धन्यवाद…..

स्वप्नील तळेकर